top of page
Writer's pictureSarika Bhoite Pawar

उद्योजकीय गुण आत्मसात करा

Updated: Apr 30, 2021


उद्योजक व्हायचय... व्यवसायिक व्हायचयं... एखादा बिझनेस सुरु करायचा असं तुम्ही ठरवल असेल तर तुम्ही उद्योजक होण्यासाठी लागणारी पहिली पायरी चढली असं म्हणता येईल. उद्योजक व्हायचं म्हटलं की आधी काय कराव लागेल तर तुमच्या मानसिकतेत बदल करावा लागेल कारण उद्योजक हा नेहमी इतरांहून वेगळा विचार करतो, त्याच्याकडे कल्पनांचे भांडार असते आणि त्याच कल्पनेतून नवनवीन उत्पादन जगाला मिळतात. हा उद्योजक इतरांहून वेगळा असतो म्हणजे कसा असतो हा नेमका? किंग कॅप जिलेट हा सामान्य कुटुंबातील मुलगा पण उद्योजक व्हायची दुर्दम्य इच्छा. यूज आणि थ्रो धर्तीवर उत्पादन करण्याच्या ध्यासापोटी त्याने दाढी करण्याच्या ब्लेडस्ची निर्मिती केली. अगदी सुरुवातीला 170 ब्लेड विकल्या गेला पण स्वतच्या कल्पनेवर विश्वास असणाऱया जिलेटच्या 1904 साली एक कोटी ब्लेडस् खपल्या आणि आज जगभरात जिलेट कंपनीचे नाव आहे. जिलेट या दाढीचे ब्लेडस तयार करण्याचे जगभरात 27-28 कारखाने असून 250 देशांमध्ये त्यांची विक्री होते, त्याची वर्षिक उलाढाल 1200 कोटी डॉलर्स असून शेअर बाजारात कंपनीची किमंत 5500 कोटी डॉलर्सच्या आसपास आहे. उद्योग करायचा म्हटला तर जोखीम ()घ्यावीच लागते. जोखीम घेण्यासाठी धैर्य महत्त्वाचे असतेच. रॉबर्ट शूलर यांच्यामते


“Courage is something you never loose. Courage is something you can always use, it’s not gift, its a decision’’


‘उद्योजक ’ व्हायचयं तर हे गुण असायलाच हवेत...


  • कठोर मेहनतीची तयारी

  • प्राप्त परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता

  • प्रचंड चिकाटी

  • निरंतर अभ्यास

  • नाविन्याचा ध्यास

  • जोखीम स्विकारण्याच धाडस (Risk Bearing Capacity)

  • योजनाबद्ध आखणीची सवय

  • इतरांहून वेगळा विचार करण्याची पद्धत

  • नवनवीन गोष्टी शिकण्याची उमेद

  • आत्मविश्वास

  • ग्राहकांची मानसिकता ओळखण्याची कला

  • व्यवस्थापन कौशल्य

  • वेगळ काहीतरी करण्याची धगधगती इच्छा

  • अचूक निर्णय घेण्याची क्षमता.

  • उद्योजकाकडे हे पाच ‘डी’असलेच पाहिजेत.

  • डिटरमिनेशन -निर्धार

  • डिसीप्लीन - शिस्त

  • डेडिकेशन- समर्पण

  • डिव्होशन - एकनिष्टपणा

  • डिक्रीमिनेशन - विवेक


या गुणांबरोबर उद्योजक होण्यासाठी मानसिकता निर्माण करणे गरजेचे आहे. पुढील गोष्टी व्यवसायिक मानसिकतेसाठी आवश्यक आहेत.


आत्मपरिक्षण करा


मी कोण आहे? माझ्या क्षमता काय आहेत? मी काय करु शकते/ शकतो? हे जाणणे महत्त्वाचे आहे . बहुतेकदा ‘मी कोण आहे’ याच बाबीवर भर दिला जातो आणि त्यामुळे ‘मी काय करु शकतो’ याचा विचारच केला जात नाही. त्यामुळे स्वतमधील गुणांना ओळखणे, क्षमतांना जाणून घेणे हेंच यशामधील गमक आहे. अंर्तमनातील साद ऐका.


नकारात्मक भूमिका सोडा


मी हे करु शकतच नाही. हे माझ्या क्षमतेपलीकडचे आहे. हे अशक्यच आहे. असं सतत म्हणून तुमच्यामध्ये नकारात्मक दृष्टीकोन वाढीस लागतो.


‘‘Nothing is impossible, because word itself says “I’m possible”


मी हे करु शकतो अशी वृत्ती ठेवल्यामुळे सकारात्मक भूमिका वाढीस लागेल. बहुतेकांची व्यवसाय सुरु करताना तो यशस्वी होईल की नाही अशीच सांशक मनोवृत्ती असते. मी यशस्वी होणारच. माझा उद्योग उत्तमप्रकारे मी करणार अशी धारणा असली पाहिजे. तुम्ही व्यवसाय सुरु केल्यावर बापरे चांगली नोकरी सोडून, उद्योगात पडलास असे म्हणणारे खूप भेटतील पण मी उद्योग- व्यवसायात पडणार नाही तर तो उभारणार आहे अशी तुमची मनोवृत्ती असली पाहिजे.


ध्येय निश्चित करा


मी हे करु शकतो ही भावना निर्माण झाली की, तुमचं ध्येय ठरवा. ‘एमलेस’ धडपड निष्फळ ठरते हे लक्षात ठेवा.हे ध्येय पूर्ण करण्यासाठी कोणत्या मार्गाचा अवलंब करावा लागेल तो मार्ग निश्चित करा. मला हे करायच आहे, माझं हे स्वप्न आहे, असं केवळ म्हणून होत नाही. तर त्या स्वप्नांना दिशा देण्यासाठी प्रयत्नांचे पंख लावावे लागतात. कल्पनाविलासात रमण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीवर भर द्या.

तुम्ही जो काही व्यवसाय सुरु करणार आहात. त्यातील व्यवसायिक यशासाठी ध्येय निश्चिती करा. तुमच्या व्यवसायाचे टार्गेट असले पाहिजे. मासिक, त्रैमासिक, वार्षिक ध्येय ठरवा. त्यानुसार मार्गक्रमण करा.


समस्यांचा बाऊ करु नका


एखादे ध्येय तुम्ही ठरवलेत, किंवा एखादे काम हाती घेतले तर छोट्या मोठ्या अडचणी, समस्या येणारचं. समस्या आल्या म्हणून भांबावून जाऊ नका. तर थंड डोक्याने त्या समस्येचे स्वरुप समजून घ्या आणि त्या समस्येतून कसा मार्ग काढता येईल याचा विचार करा.


एकाग्रता वाढवा


कोणतेही काम करताना कॉन्सन्ट्रेशन महत्त्वाचे ठरते. एकाग्रतेने मन लावून केलेले कोणतेही काम यशस्वीरित्या पूर्ण होते.


वेळेला महत्त्व द्या


गेलेली वेळ परत कधीच येत नाही. ‘एक दिन बित जाए ना माटी के मोल’ हे लक्षात ठेवा. प्रत्येक दिवसाचे प्रत्येक तासाचेच नव्हे तर प्रत्येक मिनिटाचे महत्त्व समजा. अनावश्यक कामांना प्राधान्य न देता महत्त्वाची कामे अगोदर पूर्ण करणे. कामाची विभागणी करुन प्रत्येक कामासाठी योग्य वेळ ठरवणे. सकाळापासून सांयकाळच्या कामाची यादी करुन प्रत्येक कामासाठी ठराविक वेळ ठरविणे जमवायला हवे.

महत्त्वाच्या कामांसाठीचा वेळ, त्यानंतर कमी महत्त्वाची कामे असा अग्रक्रम ठरवायला हवा. रात्रीचा दिवस करुन, काम उरकणे, ताणातून सुटका मिळणाऱया गोष्टी टाळणे हे सर्व केल्यामुळे ताण कमी न होता तो अधिकच वाढत जातो हे लक्षात घ्या. हाती घेतलेले काम योग्य वेळेत व व्यवस्थितरित्या पूर्ण होण्यासाठी टाईम टेबल (वेळापत्रक ) बनवा आणि टप्प्याटप्याने काम पूर्ण करा.


0 comments

Comments


bottom of page